व्यायामशाळा विकास अनुदान योजना
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे.
याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 जाहीर करण्यात आले आहे.
व्यायाम शाळा विकास अनुदान योजना:
या योजनेअंतर्गत व्यायाम शाळा बांधकाम, व्यायाम शाळा साहित्य व ओपन जिम साहित्य यांचा समावेश होतो.
सदर योजनेसाठी एकूण रु. 7.00 लाख इतके अनुदान देण्यात येते.
यासाठी पात्रता:
शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या शाळा व कार्यालये,
शासकीय प्रशिक्षणालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग
यांनी मान्यता दिलेल्या शाळा, महाविद्यालये, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभाग,
अल्पसंख्याक विभाग मार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक,
उच्च माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, वसतीगृह, शासकीय उपजिल्हा प्रशिक्षणालय, शासकीय प्रशिक्षणालय,
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाकडून मान्यता
प्राप्त शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यासाठी पाच वर्षे पूर्ण झालेले
असावे. अशा शाळा व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र ठरतील.
क्रीडांगण विकास अनुदान योजना
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे.
याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण २०१२ मध्ये जाहीर करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत -
- क्रीडांगण समपातळीवर करणे
- 200 मीटर अथवा 400 मीटरचा धावपट्टा तयार करणे
- क्रीडांगणास भिंतीचे किंवा तारेचे कुंपण घालणे
- विविध खेळांचे एक किंवा अधिक मैदान तयार करणे
- साधनगृह किंवा चेंजिंग रूम बांधणे
- पिण्याचे व मैदानासाठी पाणी मारण्याची सुविधा निर्माण करणे
- क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे
- क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा
- क्रीडा साहित्य खरेदी करणे
- सिमेंट भराव असलेली स्टेप गॅलरी व त्यावर शेड
- पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर सिस्टम व मैदानावर रोलिंगसाठी मिनी रोलर खरेदी करणे
या सर्व सुविधांचा समावेश केला जातो.
क्रीडा साहित्याकरिता रु. 3 लाख आणि इतर सर्व योजनांसाठी रु. 7 लाख इतके अनुदान दिले जाते.
पात्र संस्था:
शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय प्रशिक्षण संस्था, आदिवासी विकास, सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्व शासकीय शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतीगृहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच शासनमान्य शैक्षणिक संस्था, ज्या पाच वर्षांपासून कार्यरत आहेत, त्या सर्व अनुदानासाठी पात्र राहतील.
स्थानिक विकास कार्यक्रम
सन 1996-97 पासून आमदार स्थानिक विकास कार्यक्रम योजना राबविण्यात येत आहे.
त्या कामांना जिल्हा नियोजन समितीत प्राधान्य व महत्त्व मिळत नाही किंवा जी कामे जिल्हा योजनेत घेतली जात नाहीत, अशी लोकोपयोगी कामे या योजनेतून घेतली जातात.
हा कार्यक्रम राबविण्याची कार्यपद्धती व या कार्यक्रमांतर्गत कोणकोणती कामे हाती घेता येतील याबाबतचे मार्गदर्शन शासनाकडून वेळोवेळी करण्यात येते.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाकरिता दिनांक 12 जुलै 2016 व शासन निर्णय 16 सप्टेंबर 2024 या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येते.
क्रीडा सुविधा निर्माणासाठी आर्थिक सहाय्य
राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य राहावे, नागरिकांमध्ये व्यायामाची आवड जोपासावी आणि राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जेदार कामगिरी करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळांच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंचा गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा या बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाने क्रीडा धोरण 2012 तयार केले आहे.
या धोरणातील एक महत्त्वाची शिफारस म्हणजे "क्रीडा संस्था व सुविधा निर्माणासाठी आर्थिक सहाय्य" प्रदान करणे.
खाजगी स्थानिक स्वराज्य संस्था, ज्या स्वतःचे मैदान व अंशतः आर्थिक तरतूद करू शकतात, परंतु शहरीकरणामुळे खेळण्यासाठी वेळ व जागा मर्यादित आहे, त्यांना खेळ व व्यायाम सुविधा निर्माण करून देण्यासाठी 75:25 या प्रमाणात शासन व संस्थेचा सहभाग असलेली योजना राबविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
राज्यातील शैक्षणिक संस्था, खाजगी क्लब, क्रीडा मंडळी, प्राधिकरणे, स्थानिक संस्था यांच्या माध्यमातून दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण होऊन खेळाडूंच्या कामगिरीत वाढ होते आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासाठी मदत होते.
जिल्हा क्रीडासंकुल
जिल्हातील जातीत जात खेळाडु, विद्यार्थी, क्रीडा प्रेमी नागरिक यांना आकर्षक सुविधाएँ उपलब्ध करून देणे व खेळाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उदयोन्मुख खेळाडु घडविणे याकरिता जिल्हा क्रीडा संकुलाची अनुमति जिल्हा-तरावर कार्यात आलेली आहे.
यामध्ये 400 मीटर स्टेडियम धावनपथ, पॉलीमर केस फुटबॉल मैदान, मुले व मुली क्रीडाकरिता वसतिगृह, लॉनटेनिस कोट्स, हड्डी बॉल मैदान, बॅडमिंटन कोट्स, आकर्षक व्यायामशाळा (पुरुष व महिलांकरिता वेगवेगळी), व्हॉलीबॉल मैदान, आकर्षक बॉक्सिंग रिंग, टेबल टेनिस हॉल, स्टेडियम बास्केटबॉल मैदान, खुली व्यायामशाळा, कबड्डी किटन शेड, मल्लखांब, योगासन, झुंबा, मिनी गार्डन, शंकर या क्रीडा सुविधांचा समावेश आहे.
सदर क्रीडा सुविधांचा शहरातील खेळाडू, क्रीडा प्रेमी व अबालवृद्ध मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. शालेय माध्यमातून जातीत जात खेळाडूंचा सहभाग क्रीडा पद्धतींमध्ये असणे आवश्यक आहे. खेळाडूंना जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधांचा सरावासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येतात.
तालुका क्रीडा संकुल
तालुक्यातील जातीत जात खेळाडु, विद्यार्थी, क्रीडा प्रेमी नागरिक यांना आकर्षक सुविधाएँ उपलब्ध करून देणे व खेळाचे जिल्हा-तर व राष्ट्रीय स्तरावर उदयोन्मुख खेळाडु घडविणे याकरिता तालुका क्रीडा संकुलाची अनुमति तालुका स्तरावर कार्यात आलेली आहे.
जिल्हा-यातील आणखी, दारव्हा, दिनस, नेर, पुसद, उमरखेड, राळेगाव, पांढरकवडा, वणी, महागाव, 10 तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुल पुणे झाले असून सदर ठिकाणी असणार्या क्रीडा सुविधांचा लाभ तालुक्यातील खेळाडू, क्रीडा प्रेमी नागरिक व अबालवृद्ध घेत आहेत.
यामध्ये 400/200 मीटर धावनपथ, बॅडमिंटन कोट्स, आकर्षक व्यायामशाळा, संरचनात्मक भंठ, व्हॉलीबॉल मैदान, बास्केटबॉल मैदान, खुली व्यायामशाळा, कबड्डी, खो-खो मैदान, हँडबॉल, फुटबॉल मैदान इ. क्रीडा सुविधांचा समावेश आहे.
जिल्हा युवा महोत्सव
जिझयातील 15 ते 29 वर्षेआतील युवक युवतींना त्यांच्या अंगी असलेल्या सकारात्मक गुणांना चालना देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
जिल्हा क्रीडा पुरस्कार
महाऱाष्ट्र राज्यातील नामवंत विविध क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन 1969-70 पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्जवल करणारे खेळाडू घडवणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना
सन 1988-89 पासून शासनाने अंमलात आणली आहे. तसेच गेल्या क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, संघटक/कार्यकर्ता व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा गायकांतीनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वोत्तम पणाला लावून आपले जीवन क्रीडा विकासासाठी समर्पित केले आहे.
अशा गतिमान क्रीडा महर्षाचा गौरव करण्यासाठी सन-2001-2002 पासून महाऱाष्ट्र शासनाने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्याची योजना अंमलात आणली आहे.
सदर पुरस्कार 1- खेळाडू (पुरुष), 1- खेळाडू (महिला), 1- दिव्यांग महिला किंवा पुरुष व 1- क्रीडा मार्गदर्शक यांना प्रदान करण्यात येतो.
जिल्हा युवा पुरस्कार
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध विषयात युवाने पार पाडलेली भूमिका दिलेले योगदान यामुळे युवांचे एक अत्यंत समूह अशी ओळख समाजात झालेली आहे. युवांना मानव संसाधन विकासाचा मुख्य स्रोत म्हणून देखील महत्त्व देण्यात आलेली आहे. युवा हा समाजाचा अभिवृद्ध घटक असून विकासाच्या प्रगतीतील आवश्यक भाग आहे. समाजातील युवांची संख्या पाहता त्यासाठी स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता आहे. वैविध्यकरणाच्या युगात नवीन आव्हानांना तड देण्यासाठी युवांसाठी सुसंगततेची गरज आहे. या अनुषंगाने युवा धोरण 2012 शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन आदेश/2011/ड 43/के यु से 3/दिनांक 14 जून 2012 अवघे जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने धोरणातील शिफारशीच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय युवा पुरस्कार व जिल्हा स्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार आहे.
जिल्हा युवा पुरस्कारासाठी एक युवक एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना जिल्हा स्तरिय पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप गौरव पत्र, सन्मानचिह्न, रोख रक्कम दहा हजार रुपये युवक व युवतीसाठी, तसेच संस्थेसाठी गौरव पत्र, सन्मानचिह्न व रोख रक्कम ५ हजार रुपये असे दिले जाते.
प्रोत्साहनात्मक अनुदान
खेळाडूंना अंगी असलेले क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी क्रीडा क्षेत्राचा फार चांगला उपयोग होतो. भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय मुला-मुलींसाठी विविध खेळांमध्ये विविध वयोगटातील तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्राचे आयोजन करण्यात येते. तालुका, जिल्हा स्तरिय शालेय क्रीडा क्षेत्रात जात असलेल्या शाळांतील मुला-मुलींचा सहभाग होणाऱ्या सकारात्मक दृषटिकोनातून शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याची योजना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग माफ़त शासन निर्णय क्रमांक राज्यधो 2012/ड 259/के यु से 1 दिनांक 26 फेब्रुवारी 2014 या शासन निर्णयानुसार कायदेशीरपणे आहे.
विविध खेळांतील शालेय क्रीडा क्षेत्राचे 14, 17, 19 वर्षे वयोगटात आयोजन करण्यात येतात. 14 वर्षे, 17 वर्षे, 19 वर्षे वयोगटातील शैक्षणिक वषार्मध्ये जिल्हा स्तरिय सर्व क्रीडा क्षेत्रात प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते. प्रत्येक वयोगटातील प्रथम स्थानासाठी 1.00 लाख, द्वितीय स्थानासाठी 75.00 हजार आणि तृतीय स्थानासाठी 50.00 हजार इतके अनुदान वितरीत करण्यात येते.
5 टक्के खेळाडू आरक्षण
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील पदके प्राप्त करणारे खेळाडू राष्ट्रीय तसेच राज्यास लौकिक प्राप्त करून देत असतात. खेळाडूंना खेळामध्ये प्राप्त होणाऱ्या संधी व शैक्षणिक अहर्ता मिळवण्याचा कालावधी एकच असल्याने त्यांना दोन्ही आघाडीवर सारख्याच प्रमाणात लाभ देणे शक्य नसते. बऱ्याचदा त्यांची शैक्षणिक क्षेत्रात त्यांची पिछेहाट होते व त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात ते अधिक प्रगती करू शकत नाहीत. ही बाब विचारात घेऊन शासनाने विविध शासकीय विभागात व शासकीय मालकीच्या नियंत्रणाखाली असलेल्या महामंडळात स्थायी भरतीचे ठिकाण व शासकीय सवलती प्राप्त केलेल्या संस्थांमधून नोकरीसाठी अत्यंत गुणवत्तापूर्ण क्रीडा पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंना 5 टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय दिनांक 30. 4. 2005 या शासन निर्णयानुसार घेतला. या शासन निर्णयानुसार संबंधित विभागामार्फत पद भरतीसाठी प्रथम अजंती मागविण्यात येतात. अजंती केलेल्या सर्व खेळाडूंच्या क्रीडाविषयक पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र लेखी परीक्षेत पास झाल्यानंतर संबंधित विभागाकडून मान्यता करण्यासाठी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कडे पाठविण्यात येतात. खेळाडूंची संघटना सचिवांचे व व्यावसायिक संचालकांचे योग्यतापत्र प्राप्त करून त्यानुसार आयुक्तालयातील संबंधित अधिकारी द्वारा प्रमाणपत्र पडताळणी करून संबंधित विभागास पास अथवा अपात्र अहवाल पाठविण्यात येतो.
कुस्ती कलेचा विकास
कुस्ती कलेचा विकास या योजनाअंतर्गत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमाफत आयोिजत केलेल्या पध्दतीमध्ये विविध व सहभाग घातक कुस्तीगीरांना मानधन अदा करण्यात येते.
तालीम कुस्ती कलेचा विकास
ग्रामीण व शहरी भागात कुस्ती खेळाची विशेष आवड आहे. हा खेळ सामान्यतः माती व गादी विभागात खेळला जातो. मातीच्या आखाडा तालीम यांचे विशेष ओळख सवर्धन आहे. कुस्तीतील बदल लक्षात घेऊन आखाडा/तालमीचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.
यासाठी मातीच्या आखाड्यांचे बांधकाम, तालीम यांमध्ये सुधारणा व मचॅ घेण्यासाठी क्रीडा मंडळ कुस्ती कलेच्या विकासाचे कायदेमंडित करणाऱ्या प्रमाणीकृत संस्थांना ७.०० लाख रुपयांचे सहाय्य देण्यात येते.
तालीम आखाड्याचे ठिकाणी आधुनिक प्रशिक्षणासाठी उपकरणे, मसाज सेंटर, सोना, स्टीम बाथ, आणि मॅटफुल जाकेट इत्यादी विकसित करीत येतात.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू लागणाऱ्या तीन वर्षात निर्माण करणाऱ्या संस्थांना सहकार्य देण्यात येते. इतर उपाय योजना क्रीडा विभागामार्फत कार्यान्वित केल्या जातात.जिल्हा क्रीडा विकास
जिल्हा क्रीडा विकास कार्यक्रम जिल्हा स्तरावर क्रीडा विकासासाठी स्थापन केला जातो. खेळाडूंना नियमित प्रशिक्षण दिलं जातं. तालुक्याच्या स्तरावर नियमित प्रशिक्षणासाठी तालुका क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आले आहे.
तालुका व जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व क्रीडा सुविधा नियमितपणे या उपक्रमासाठी वापरल्या जातात. जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक मार्गदर्शन करतात तसेच क्रीडा संस्थांमधील शिक्षकांसाठी कार्यशाळा तसेच उजळणी वगैरे नियमित आयोजन केलं जातं.
जिल्हा स्तरावर विविध खेळांचे नियमित प्रशिक्षण व वर्षातून एक वेळ १० दिवसांचे शिबिरांचे आयोजन केलं जातं.
राष्ट्रीय क्रीडा दिन
महाराष्ट्रातील पहिले ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू श्री. खाशाबा जाधव यांच्या जन्मदिवस १५ जानेवारी हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून सन २०२४ पासून साजरा करण्यात येत आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह
हॉकीचे जादुगर श्री. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच १२ ते १८ डिसेंबर हा कालावधी क्रीडा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह खेळाडूंना अधिक प्रेरणादायी ठरावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सन्मान, अनुभवी खेळाडूंयाकडून नवोदीत खेळाडूंना प्रोत्साहन मिळवण्यासाठी चर्चासत्रे, परिसंवाद, दर्शनीय सामन्यांचे आयोजन, खेळांची तांत्रिक माहिती, क्रीडाबिषयक संशोधन सहकार्याची ओळख, नागरिकांमधून शारीरिक व्यायामाचे महत्त्व जागरूक करण्यासाठी विविध उपक्रम सायकल रॅली यांचे आयोजन केले जाते.
क्रीडा सप्ताह दरम्यान तीन ते पाच किलोमीटरची दौड आयोजित केली जाते. यामध्ये समाजातील सक्रिय नागरिक, खेळाडू, विद्यालयांचे विद्यार्थी, क्रीडा संघटक, क्रीडा मंडळे इत्यादींचा समावेश असतो.
दिन व युवा सप्ताह
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. १५ ते ३५ वयोगटातील महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांमधून स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करण्यासाठी तसेच युवांमधून नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. तसेच दिनांक १२ ते १९ जानेवारी हा युवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
यावेळी शाळा व महाविद्यालयांमधून चर्चासत्रे, परिसंवाद, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, वाचन व लेखन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
खेलो इंडिया
सरकारच्या खेलो इंडिया अंतर्गत "हॉकी प्रशिक्षक कॅम्प" यवतमाळ येथील अजयंगकर कॅम्प शाळा, यवतमाळ येथे नियमित सकाळ-सायंकाळ अशा दोन सत्रांमध्ये सुरु आहेत.
खेलाडूंकरिता प्रशिक्षण शिबीर
दरवर्षी खेळाडूंकरिता जिह्यात आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन केले जाते.